आम्ही सातारकर
सातारा हे शहर महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात येते. सातारा हे नाव शहराला त्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे पडले आहे.हे शहर समुद्रसपाटीपासून २,३२० मी. उंचीवर कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगळुर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे.
महाबळेश्वरचा धुंद वारा, आमचा सातारा,
शिवाजी महाराजांचा मर्द मराठा, आमचा सातारा,
सहायाद्रीच्या काड्या कपार्या, आमचा सातारा,
प्रतापगडाच्यावाघ नख्या, आमचा सातारा,
पालीच्या खनडोबरायचाएलकोट भंडारा, आमचा सातारा,
आई मांढरदेवीचा आशीर्वाद, आमचा सातारा,
कंद पेढया पासून फेट्या पर्यंत मातीच्या अस्सल सुगंध अन् प्रेमाचा, आमचा सातारा,
घाटी शिव्या मधील रांगडे प्रेम, आमचा सातारा,
कासचे पठार आणि ठोसेघरचा कोसळता धबधबा, आमचा सातारा,
निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला, आमचा सातारा,
शिवरायांच्या गदिचा वारस, आमचा सातारा,
नाद नाय करायचा, शेवटी आमचा सातारा...