Business and Personal web pages from India Search result

Rukhmini Ganesh Utsav Mandal,amravati

Rukhmini Ganesh Utsav Mandal,amravati

Rukhmini nagar, Amravati ,
अमरावती आणि गणेशोत्सव :- गणेशोत्सवाच्या स्वरूपात बदल होत असला तरी अमरावती परिसरातील बहुतांश गणेश मंडळांनी आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. बालगोपाळांचा सहभाग, दैदीप्यमान देखावे, या देखाव्यांतून गहन आशय मांडण्याची प्रगल्भता, वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न, सामाजिक विषयांवर प्रकाशझोत टाकताना या क्षेत्रात शक्य तितके काम करण्याची ऊर्मी, ही अमरावतीच्या गणेशोत्सवाची वैशिष्टय़े म्हणता येतील. उत्सवप्रिय अमरावतीत गणेशोत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. कारण अमरावतीतील माणूस सोळा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या गणेशाला आपले आराध्य दैवत मानतो. त्यामुळेच कामानिमित्ताने इतर शहरात राहणारा नोकरदार लाडक्या गणरायाच्या या उत्सवासाठी दरवर्षी न चुकता आपापल्या गावात दाखल होत असतो. घराघरातून सजावट करून बाप्पाच्या आगमनाची तयारी केली जाते. वाजतगाजत डोक्यावर उचलून गणरायाला घरी आणले जाते. गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि रूढी आणि परंपरा जपत हा सण मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो.