Business and Personal web pages from India Search result

New English School Satara

New English School Satara

न्यू इंग्लीश स्कूल सोमवार पेठ, सातारा, Satara ,
सध्या न्यू इंग्लीश स्कूल या नावाने प्रसिद्ध असलेली ही शाला मुळात श्री. दत्तोपन्त जोशी यांनी १८८७ मध्ये चालू केली. व पुढे ही शाळा ६ डिसेंबर १८९९ रोजी डेक्कन एजुकेशन सोसायटीकडे हस्तांतरीत करण्यात आली. कै. गुरुवर्य सीताराम गणेश देवधर यांनी या प्रशाळेचा विकासाचा खरा पाया घातला. ती दिवांणांच्या बागेत भरू लागली आणि त्यानंतर १९०४ पासून स्वतःच्या मालकीच्या सध्याच्या जागेत भरू लागली. अनेक नामवंत, त्यागी आणि समर्पण वृत्तीच्या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आणि ध्येयवादी शिक्षकांच्या सहकार्याने या प्रशालेचा सतत विकास होत राहिला आणि सातारा परिसरातील अनेक पिढ्यांची जडणघडण या शाळेच्या संस्कारांमधून होत राहिली.