Business and Personal web pages from India Search result

My Sangli ( माय सांगली )

My Sangli ( माय सांगली )

Sangli, Sangli ,
सांगली हे शहर महाराष्ट्राच्या दक्षिणेला वसलेले आहे. सांगलीची लोकसंख्या ४,३६,००० च्या आसपास आहे. सांगली शहर हे सांगली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. या शहराचे नाव इथे पूर्वी असलेल्या सहा गल्ल्यांवरून पडले असे समजले जाते. मुख्य भाषा मराठी असून कन्नड[संदर्भ द्या], हिंदी आणि इंग्रजी भाषाही येथे बोलल्या जातात. सांगलीतील पटवर्धन संस्थानचे गणेश मंदिर सुप्रसिद्ध आहे. सांगली शहर हे पहिलवानांसाठीही प्रसिद्ध आहे. हिंदकेसरी मारूती माने याच मातीतले. सांगली येथील हळद बाजारपेठ ही अशियातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. सांगली जिल्हा द्राक्षांच्या उत्पादनासाठीही प्रसिद्ध आहे. नुकतेच पलूस येथे द्राक्षांवर प्रक्रिया करणारे वाईन पार्कही सुरू झाले आहे. भडंग(एक प्रकारचे चुरमुरे) हा सांगलीकरांचा आवडता खाद्यपदार्थ आहे.
Tel: 9004036573